इंधनाशिवाय ग्रीन एनर्जी निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:22 AM2019-12-16T00:22:54+5:302019-12-16T00:23:33+5:30

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी ...

Green energy generation without fuel | इंधनाशिवाय ग्रीन एनर्जी निर्मिती

इंधनाशिवाय ग्रीन एनर्जी निर्मिती

Next

रत्नागिरी : स्लोपिंग ट्रॅक आणि रोलरचा वापर अत्यंत सोप्या पध्दतीने करून कोणत्याही इंधनाशिवाय नैसर्गिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीचा (ग्रीन एनर्जी प्रॉडक्शन) प्रयोग जाकीमिऱ्या येथील विनायक बंडबे यांनी यशस्वी करून दाखविला आहे. सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रायोगिक प्रकल्पातून ५ हजार वॅट (५ किलोवॅट) ऊर्जा निर्मिती होणार आहे. त्याचे प्रात्यक्षिकही बंडबे यांनी रविवारी पत्रकारांसमोर सादर केले. या प्रकल्प संशोधनाचे पेटंट मिळावे म्हणून बंडबे यांनी शासनाच्या संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून हा प्रायोगिक प्रकल्प उभारणीचे काम सुरू होते. असे प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारल्यास त्यातून स्वस्त व प्रदूषणमुक्त वीज निर्मितीबरोबरच हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार असल्याचे बंडबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशा प्रकल्पांमध्ये आर्थिक गुंतवणूक करणाऱ्यांना भागिदारीद्वारे मालकही होता येईल, असेही त्यांनी सांगितले.
जाकीमिºया येथे सध्या उभारलेला प्रायोगिक प्रकल्प हा लहान स्वरुपातील असून, या प्रकारे १५ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही उभारता येईल. त्यासाठी ७ कोटी रुपयांपर्यंत खर्च येऊ शकेल. तसेच त्यामध्ये २०० लोकांना रोजगार मिळू शकेल. अशा १५ मेगावॅट प्रकल्पाची उभारणी इतर प्रकारे केल्यास त्यासाठी ९० ते २७० कोटीपर्यंत खर्च येऊ शकेल.
स्लोपिंग ट्रॅक आणि रोलर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रति मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पासाठी ४० ते ५० लाख रुपये खर्च येईल. इतर प्रकारे १ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी ५ ते ७ कोटी रुपये खर्च येईल, अशी माहितीही बंडबे यांनी दिली.
सध्या शासकीय स्तरावरील वीज महामंडळाची वीज प्रतियुनिट ७ रुपये दराने उपलब्ध होते. मात्र स्लोपिंग तंत्रज्ञानाद्वारे उत्पादीत केलेली वीज ही प्रतियुनिट २ रुपयेने उपलब्ध होऊ शकते. स्लोपिंग तंत्राद्वारे वीज निर्मितीच्या या प्रकल्प उभारणीत भारती शिपयार्डचे अभियंता गॉडविन नरोन्हा, सुधीर वासावे व संतोष पावरी यांची मदत बंडबे यांना लाभली आहे.
हजारोंना रोजगार
१५ मेगावॅट ग्रीन एनर्जी प्रोजेक्टसाठी १० गुंठे जागा लागेल व त्याद्वारे ४ ते ५ गावांना वीज पुरवठा करता येईल, असेही बंडबे यांनी सांगितले. या प्रकल्पामध्ये ८ तास काम करणाºयांना प्रत्यक्षात ८ तासातील २ तासच काम करावे लागणार आहे. इंधन न वापरता वीज निर्मिती करणारे प्रकल्प भारतभर उभारले गेल्यास त्यातून हजारो बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकेल. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोणत्याही इंधनाव्यतिरिक्त वीजनिर्मिती होण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर बंडबे यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना यासाठी आता भक्कमपणे पाठिंबा मिळणे गरजेचे आहे.

Web Title: Green energy generation without fuel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.