गटविकास अधिकाऱ्यांनी घेतला अभियानाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:37+5:302021-05-07T04:33:37+5:30
चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘माझा जिल्हा, माझी जबाबदारी’ अभियानअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्यविषयक सर्वेक्षण केले जात आहे. हे ...
चिपळूण : तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘माझा जिल्हा, माझी जबाबदारी’ अभियानअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबाचे आरोग्यविषयक सर्वेक्षण केले जात आहे. हे सर्वेक्षण ग्रामीण भागात योग्यरित्या केले जाते की नाही, याबाबत गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी ‘सरप्राईज व्हिजिट’ देत त्याचा आढावा घेतला.
गेल्या दोन-तीन दिवसात गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. कामथे येथे सुरू असलेल्या सर्वेक्षणठिकाणी मंगळवारी गटविकास अधिकारी यांनी अचानक भेट दिली व सर्वेक्षणातील कर्मचारी कशा पद्धतीने सर्वेक्षण करतात, याची माहिती घेतली. सहभागी कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुकही केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश खेडेकर, रजनी बाईत, पूजा बाईत, शिक्षिका, ग्रामसेविका अनिता पाटील, आशा सेविका सुवर्णा माटे आणि हुमणेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.