पालकमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:48+5:302021-05-14T04:31:48+5:30
रत्नागिरी : राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी एका बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा ...
रत्नागिरी : राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी एका बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील होते.
या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव तसेच खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर, आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री परब यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्य:स्थितीची माहिती घेताना लसीकरणाचाही आढावा घेतला. याचबरोबर खरीप हंगामाच्या अनुषंगानेही त्यांनी आढावा घेतला. निसर्ग चक्रीवादळातील नुकसान भरपाईचा आढावा घेतानाच सध्या हवामान विभागाने शक्यता वर्तविलेल्या वादळाच्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यासंदर्भात संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खनिकर्म योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदचे अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, आदी उपस्थित होते.