पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

By मेहरून नाकाडे | Published: January 13, 2024 11:26 AM2024-01-13T11:26:55+5:302024-01-13T11:27:54+5:30

२६ जानेवारीला सावकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण.

guardian minister uday samant inspected the work of veer savarkar theatre | पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

पालकमंत्री उदय सामंत यांनी केली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह कामाची पाहणी

मेहरून नाकाडे, लोकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (दि.१३) नगरपरिषदेच्या सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली.

मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर  वि. दा. सावरकर, थिबा पाॕईंट येथील  जिजामाता उद्यान आणि शिवसृष्टी येथे भेट देवून सुरु असणाऱ्या कामांची पाहणी केली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याच्या जागेबाबत, सनसेट पाईंट, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी रेलिंग, संरक्षित भिंत, स्वच्छता आणि फूड कोर्टबाबत पालकमंत्री सामंत यांनी  विशेष सूचना केल्या. या कामांसाठी आवश्यक तो निधी दिला जाईल. ही सर्व कामे गतिने सुरु ठेवा, असेही पालकमंत्री सामंत यांनी सूचित केले. 

दि. २६ जानेवारी रोजी सावरकर नाट्यगृहाचे होणार लोकार्पण होणार असून रत्नागिरीकरांना दिलेला शब्द पूर्ण करत असल्याचा मला आनंद होत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. यावेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, युवा तालुका प्रमुख तुषार साळवी उपस्थित होते.

Web Title: guardian minister uday samant inspected the work of veer savarkar theatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.