Ratnagiri: कामचुकार ठेकेदारांची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

By शोभना कांबळे | Published: June 5, 2023 02:12 PM2023-06-05T14:12:14+5:302023-06-05T14:14:48+5:30

जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिले.

Guardian Minister Uday Samant took action against the negligent contractors | Ratnagiri: कामचुकार ठेकेदारांची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

Ratnagiri: कामचुकार ठेकेदारांची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी आज जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांना धारेवर धरत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आदेश दिले.

राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला.

जिल्ह्यात काही ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे.तर एकीकडे काही कामचोर ठेकेदार काम घेऊन ती कामे तशीच ताटकळत ठेवली आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणीत आहेत. यावेळेस कोटींचा निधी उपलब्ध असून, या कामात दिरंगाई करत असलेल्या अधिकारी ठेकेदार यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच झापले. पाण्याचा प्रश्न उद्भवत असून, युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: Guardian Minister Uday Samant took action against the negligent contractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.