चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

By मनोज मुळ्ये | Published: July 29, 2023 10:06 AM2023-07-29T10:06:34+5:302023-07-29T10:06:51+5:30

प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे

Guardian Minister Uday Samanta's visit to Chanderai flood victims; Shopkeepers, tapri holders will get compensation | चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

चांदेराईतील पूरग्रस्तांची पालकमंत्री उदय सामंतांची भेट; दुकानदार, टपरीधारकांना मिळणार भरपाई

googlenewsNext

रत्नागिरी : रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सकाळी ७:३० वाजताच चांदेराई गावातील पूर परिस्थितीची  पाहणी केली. तब्बल ३६ तास येथील बाजारपेठेत पाणी असल्याने ७७ दुकानांचे नुकसान झाले असून, त्यांना प्रत्येकी ५० हजारांची तर छोट्या टपऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई देण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले. 

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. मंगळवारपासून संततधार कोसळणाऱ्या पावासामुळे गुरुवारी चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरले. ते शुक्रवारी ओसरले.  पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी तेथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, सुमारे ७७ दुकानांमध्ये पाणी शिरले होते. २ दिवस दुकानात पाणी शिरले होते.

त्यामुळे प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टपरीवाले आहेत त्यांना दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्या ठिकाणी जमीन खचण्याच्या घटना घडल्या आहेत त्यांची देखील पाहणी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी यांना दिल्या आहेत. चांदेराई नदीमधील गाळ यंदा काढण्यात आला होता. अजूनही येथे गाळ असून तो काढण्याची  ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करून सगळा गाळ काढण्यात येईल असे ते म्हणाले.

Web Title: Guardian Minister Uday Samanta's visit to Chanderai flood victims; Shopkeepers, tapri holders will get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.