शिक्षण विभागावर पालकमंत्र्यांचा डोळा?
By admin | Published: July 12, 2014 12:36 AM2014-07-12T00:36:39+5:302014-07-12T00:37:53+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती, कंपाऊंड वॉल बांधण्याच्या आराखड्याला शिक्षण समितीकडून मंजुरी दिली जाते़
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्ती, कंपाऊंड वॉल बांधण्याच्या आराखड्याला शिक्षण समितीकडून मंजुरी दिली जाते़ परंतु पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार निधी खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला दिली़ त्यामुळे आजच्या शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी प्रचंड गदारोळ करून पालकमंत्र्यांबद्दल संताप व्यक्त केला़
आजची सभा सभापती सतीश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य विलास चाळके, प्रकाश शिगवण, श्रीपत पवार, सुनील दळवी, विकास नलावडे, सदस्या वेदा फडके, नेहा माने, माधवी खताते, देवयानी झापडेकर, जान्हवी धाडवे व अधिकाऱ्यांच्या उपस्थित पार पडली़
शाळा दुरुस्ती, नाविन्यपूर्ण योजनेतून कंपाऊंड वॉल बांधणे यासाठी नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे़ त्यासाठी शिक्षण व स्थायी सभेत आराखडा मंजूर करुन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जातो़ याबाबत आज झालेल्या सभेत यावर जोरदार चर्चा झाली़ जिल्हा नियोजन समितीकडून निधी देण्यात आला असला तरी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार तो खर्च करावयाचा असल्याने सदस्य व सभापतींनी त्याबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली़ शिक्षण समिती आणि जिल्हा परिषदेच्या हक्कांवर पालकमंत्र्यांकडून गदा आणण्याचा प्रकार आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशी भावना या सभेत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली. (शहर वार्ताहर)