वृक्ष कोसळल्याने गुहागर मार्ग तासभर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:17+5:302021-05-14T04:31:17+5:30
चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावरील मालघर येथे पिंपळाचा जुनाट वृक्ष कोसळल्याने हा मार्ग गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून तासभर ठप्प होता. ...
चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावरील मालघर येथे पिंपळाचा जुनाट वृक्ष कोसळल्याने हा मार्ग गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून तासभर ठप्प होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा मार्ग मोकळा केला.
मालघर येथे रस्त्यालगत असलेला वृक्ष अचानक कोसळला. या वृक्षाने संपूर्ण रस्ता व्यापला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद पडली होती. याविषयी मालघरचे सरपंच सुनील वाजे यांनी नजीकच्या गणेशखिंड येथील पोलिसांना माहिती देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेस पाचारण करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एकेरी वाहतूक सुरू केली. जेसीबीच्या साहाय्याने वृक्ष रस्त्याच्या एका बाजूला हटविण्यात आला. साधारण तासाभरात हा मार्ग मोकळा झाला.
--------------------------------
गुहागर-चिपळूण मार्गावरील मालघर येथे पिंपळाचा जुनाट वृक्ष कोसळल्याने हा मार्ग बंद पडला होता.