गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 01:00 PM2019-07-24T13:00:34+5:302019-07-24T13:03:55+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

Guhagar - Traffic jam collapses in Paddy | गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

गुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देगुहागर - भातगावात दरड कोसळून वाहतूक ठप्पगणपतीपुळे परिसराला फटका, रस्ता खचल्याने अनेक मार्ग बंद

रत्नागिरी : जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा गुहागर तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. गुहागर भातगाव देऊळवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे. तर मुसळधार पावसाचा तडाखा गणपतीपुळे परिसरालाही बसला आहे. पुढील २४ तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे.

सोमवारपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे प्रकार घडले असून, नदी, नाल्यांना पाणी आले आहे. राजापुरातील अर्जुना नदीपात्राला पूर आल्याने पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत आले होते. रात्री हे पाणी बाजारपेठेतील दुकानांमध्ये शिरू लागल्याने व्यापाऱ्यांनी रात्रीच दुकानातील सर्व माल इतरत्र हलविण्यास सुरूवात केली. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मंगळवारी पुराचे पाणी ओसरले होते.

गेल्या आठवड्यात गुहागर तालुक्यातील भातगाव रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा दरड कोसळल्याने सकाळपासून वाहतूक ठप्प आहे. देवरूख साटवली येथे देखील रस्ता खचला आहे. खेड तालुक्यातील विराचीवाडी, वेरळ, सुकिवली - भास्ते, ओक्रवाडी, शेल्डी या भागात घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

तालुक्यातील रघुवीर घाटात सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्याने दरड कोसळल्याने वाहतूक बंद पडली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही दरड बाजूला केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. गुहागर - चिपळूण मार्गावर सोमवारी झाड पडल्याने वाहतूक बंद पडली होती. हे झाड बाजूला करण्यात आले असून, या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये - मजगाव रस्ता खचल्याने सोमवारी रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर धामणंद - नेवरे मार्गावर रस्ता खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सोलगाव - बौद्धवाडी - बाणेवाडी रस्त्याच्या पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

Web Title: Guhagar - Traffic jam collapses in Paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.