गुहागरचा वेदांत खामकर भारतीय संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:45+5:302021-04-03T04:28:45+5:30
फोटो नं. ०२आरटीएन०४.जेपीजी फोटो कॅप्शन इंडो नेपाळ स्पोर्टस् चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वेदांत खामकर याला महाविद्यालयाचे ...
फोटो नं.
०२आरटीएन०४.जेपीजी
फोटो कॅप्शन
इंडो नेपाळ स्पोर्टस् चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल वेदांत खामकर याला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश पवार, विभागप्रमुख प्रा. आशिष चौधरी यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यातील महर्षी पर्शुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरमधील मेकॅनिकल विभागाचा वेदांत शैलेश खामकर यांची इंडो नेपाळ स्पोर्टस चॅम्पियनशील टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा ७ ते १२ एप्रिल दरम्यान टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया व नेपाळ टेनिसबॉल क्रिकेट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे.
लहानपणापासून क्रिकेटचा छंद असलेला वेदांत खामकर संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावचा आहे. स्थानिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असताना रत्नागिरी जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रकाश तांबीटकर यांनी वेदांतमधील गुणवत्ता ओळखून स्पर्धात्मक खेळासाठी निवड केली. जिल्हा सचिव प्रकाश तांबिटकर व राज्य असोसिएशन जनरल सचिव महम्मद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तो पुढील यशस्वी वाटचाल करीत आहे.