दहिवली येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:34+5:302021-04-02T04:32:34+5:30
चिपळूण : उन्हाळ्यात पालेभाज्यांसह अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील दहिवली खुर्द पुनवतवाडी येथील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले ...
चिपळूण : उन्हाळ्यात पालेभाज्यांसह अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱ्या तालुक्यातील दहिवली खुर्द पुनवतवाडी येथील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांना पिकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तालुक्यातील दहिवली खुर्द पुनवतवाडी येथे बहुसंख्य शेतकरी हे भातशेती बरोबर उन्हाळ्यात पालेभाज्या व कलिगंड अशी पिके घेत असतात. परंतु बदल्यात हवामानामुळे या पिकावर विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव निर्माण होतो म्हणून या सगळ्या समस्यांना कोणती खते व औषधे वापरावी यासाठी कृषी काॅलेजचे प्रा. संग्राम ढेरे यांनी मार्गदर्शन केले. या शेतकऱ्यांना मार्गदर्शनचे आयोजन दहिवली खुर्दचे उपसरपंच सचिन नागले यांनी केले. यावेळी दहिवली खुर्दचे माजी सरपंच बाबाराम जोईल, गाव तंटाकमिटीचे माजी अध्यक्ष विठ्ठल निर्मळ व संतोष पुनवत व ग्रामस्थ उपस्थित होते.