विद्यार्थ्यांचा तणाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:26+5:302021-04-06T04:30:26+5:30
रत्नागिरी : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांच्या काळात निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करून, त्यावर मात करण्यासाठी ...
रत्नागिरी : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांच्या काळात निर्माण होणाऱ्या तणावाचे व्यवस्थापन करून, त्यावर मात करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ‘हार्टफुलनेस एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच मुलांच्या मनावरील ताण दूर करण्यासाठी नेमके काय करावे याचे उपायही यामध्ये सुचविण्यात आले. धैर्य आणि तणावाचे नियोजन, शिस्तबद्धता आणि तणावाचे नियमन तसेच तणावाचे नियमन असे तीन प्रकरणांचे व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी सोशल मीडियावर मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी परिषदेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. समुपदेशकांच्या नियुक्तीपासून ते ऑनलाइन शिबिराच्या आयोजनांचा समावेश आहे. या व्हिडिओचा फायदा विद्यार्थ्यांना तणामुक्त करण्यासाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.