नारळ खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:08+5:302021-09-24T04:37:08+5:30

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी ...

Guidance system on coconut manure management | नारळ खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने मार्गदर्शन

नारळ खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने मार्गदर्शन

Next

रत्नागिरी : शहरानजिकच्या भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ पीक खत व्यवस्थापनाविषयी दूरदृश्य प्रणालीने (व्हिडीओ कॉन्फरन्स) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये (रत्नागिरी)चे प्रमुख व कृषिविद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी नारळ लागवडीसाठी लागणारी जमीन, हवामान, जाती, रोपांची निवड, लागवड पद्धती, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, आंतर व मिश्र पिके, कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

डॉ. वैभव शिंदे यांनी कोकणातील नारळ लागवडीची सद्यस्थिती व शेतकऱ्यांची पुढील वाटचाल कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते. याचवेळी मागणी मात्र ९८ कोटी नारळ फळाची आहे. महाराष्ट्रात साधानतः ५० टक्के उत्पादन होते, बाकीची मागणी ही इतर राज्यांकडून आयात केली जाते. यामध्ये सुधारणा करावयाची असल्यास राज्यातील नारळ क्षेत्र वाढले पाहिजे, असे आवाहन डॉ. वैभव शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसनही डॉ. वैभव शिंदे यांनी केले.

रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी आभार मानताना रिलायन्स फाऊंडेशन करत असलेल्या कामाबद्दल माहिती दिली व रिलायन्स फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांसाठी, पशुपालक यांच्या मार्गदर्शनासाठी असलेल्या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांक १८००४१९८८०० वर संपर्क साधण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे व कार्यक्रम सहायक चिन्मय साळवी यांनी केले. या कार्यक्रमाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड येथील नारळ उत्पादक, शेतकरी व बागायतदार यांनी उत्स्फूर्त हजेरी लावली.

Web Title: Guidance system on coconut manure management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.