गुणदे प्रशालेची कृष्णाली आवटे जोपासतेय चित्रकलेचा छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:22 AM2021-06-26T04:22:25+5:302021-06-26T04:22:25+5:30
खेड : काेरोनाच्या भीतीमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आवडीचे काम ...
खेड : काेरोनाच्या भीतीमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आवडीचे काम करायला तसा कमीच वेळ मिळतो. शाळा बंद,पण घरीच राहून आता या सुटीचा उपयोग करून सरस्वती शिक्षण संस्था संचलित सद्गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदेची विद्यार्थिनी कृष्णाली आवटे चित्रकलेचा छंद जाेपासत आहे़
कृष्णाली हिला चित्रकलेची विशेष आवड आहे. ती लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद जोपासत आहे़ त्यामध्येही तिला हुबेहूब चित्र काढायला जास्त आवडतं. कृष्णालीचे आई-बाबा सांगतात की, कृष्णालीला हा छंद गुणदे शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे लागला आहे. कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद झाल्या. मग फक्त टीव्ही, खेळ न करता तिने तिला चित्रकलेचे सर्व साहित्य आणून दिले. आपला छंद जोपासताना निसर्ग, प्राणी, पक्षी, कार्टुन्स अशी वेगवेगळी चित्र काढत आहे. चित्र काढताना स्केचबुक तिच्यासोबत नेहमीच असते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा ती स्केच काढते. पण, आता तिला भरपूर वेळ मिळत असल्याने ती मनसोक्त चित्र काढत आहे. तिच्या या छंद जोपासण्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे, सचिव सुभाष पवार, मुख्याध्यापिका अश्विनी जोशी, संचालकांनी शुभेच्छा दिल्या.