चिपळूण बाजारपेठेतील गटारे गाळाने भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:32 AM2021-04-27T04:32:15+5:302021-04-27T04:32:15+5:30
चिपळूण : येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारात बांधकाम व्यावसायिकाने इमारतीसाठी उपसा केलेला गाळ सोडल्याने ही गटारे तुंबली आहेत. ...
चिपळूण : येथील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारात बांधकाम व्यावसायिकाने इमारतीसाठी उपसा केलेला गाळ सोडल्याने ही गटारे तुंबली आहेत. या गटारांची साफसफाई करताना नगर परिषद सफाई कामगार हैराण झाले आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने नगर परिषदेची यंत्रणा विविध कामांत गुंतून गेली आहे. सफाई कामगारांनाही नेहमीच्या सफाईच्या कामाव्यतिरिक्त अन्य कामे करावी लागत आहेत. त्यामुळे सफाईच्या कामासाठी कामगार संख्या कमी झाली आहे. तसेच शहरातील विविध भागांत गटारे व नालेसफाई मोहीम हाती घेतली आहे. अशातच बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारात एका बांधकाम व्यावसायिकाने इमारतीच्या बांधकामासाठी उपसा केलेला गाळ सोडल्याने बाजारपेठेतील सांडपाणी तुंबले आहे.
याबाबत बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी नगर परिषदेकडे तक्रारी केल्यानंतर सोमवारी येथे साफसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी तीन गाड्या भरून गटारातील गाळ काढण्यात आला. त्यामुळे सफाई कामगार हैराण झाले. याविषयी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कोणतीही कारवाई न करता केवळ समज देण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
फोटो-
चिपळूण बाजारपेठेतील मुख्य रस्त्यालगत असलेल्या गटारातील गाळ काढण्यात आला.