केश कर्तनालये, शैक्षणिक संस्था बंद, लग्नसमारंभ मर्यादित संख्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:19+5:302021-04-07T04:32:19+5:30

- सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील; मात्र परीक्षा असल्यास महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास त्रास ...

Hairdressers, educational institutions closed, weddings in limited numbers | केश कर्तनालये, शैक्षणिक संस्था बंद, लग्नसमारंभ मर्यादित संख्येत

केश कर्तनालये, शैक्षणिक संस्था बंद, लग्नसमारंभ मर्यादित संख्येत

Next

- सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील; मात्र परीक्षा असल्यास महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास त्रास होऊ नये म्हणून संबंधित विभागाने संबंधित आपत्ती व्यवस्थापन,| प्राधिकरणास माहिती देऊन अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश देण्यात यावा.

- सर्व प्रकारचे खासगी शिकवणी वर्ग बंद राहतील.

- सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी. जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीत लग्नसमारंभास परवानगी राहील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त २० लोकांना परवानगी असेल.

- रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पदार्थ जागेवर खाण्यास मनाई. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ वा. ते रात्री ८ वा. यावेळेत सर्व दिवशी सुरू ठेवता येतील. स्थानिक प्रशासनाने या विक्रेत्यांवर प्रत्यक्ष किवा सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवावे.

- कारखाने व उत्पादक आस्थापना यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे शारीरिक तापमान तपासूनच प्रवेश द्यावा.

- सर्व वृतपत्रांची छपाई आणि वितरण सुरू राहील. वृत्तपत्रांची घरपोच सेवा सर्व दिवशी सकाळी ७ ते रात्री ८ यावेळेत करता येईल.

-सार्वजनिक स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.

- सर्व कार्यालये, आस्थापना, कारखाने यातील सर्व कामगारांचे लसीकरण तत्काळ करून घ्यावे व लसीकरण होत नाही तोपर्यंत काेरोना आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र सोबत बाळगावे त्याची मुदत

१५ दिवस असेल. हे नियम १० एप्रिलपासून अमलात येतील.

- बांधकाम क्षेत्रात बांधकामाशी संबंधित कर्मचारी, मजूर यांना बांधकामाच्या ठिकाणी राहण्याची सोय आहे अशा बांधकाम व्यवसायास परवानगी असेल, अशा ठिकाणी साधन सामग्री वाहतुकीव्यतिरिक्त कामगार व इतर वाहतुकीस परवानगी असणार नाही.

Web Title: Hairdressers, educational institutions closed, weddings in limited numbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.