दिल्लीपर्यंत भीक मागूनही हात रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 10:57 PM2017-10-01T22:57:22+5:302017-10-01T22:57:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : भाजपमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत भीक मागूनही नारायण राणेंचे हात रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे आता भाजप नेत्यांची भाटगिरी करून काही हाती लागते का, याची ते वाट बघत आहेत, असा टोला खासदार विनायक राऊत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.
राजकीय क्षेत्रात ‘आपल्याबरोबर दोघे फ्री’ ही आॅफर देत नारायण राणे फिरत होते. मात्र त्यांची ही आॅफर कोणीच स्वीकारली नाही. त्यामुळे त्यांना नाईलाजाने ‘महाराष्टÑ स्वाभिमान’ पक्ष काढावा लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही. स्वाभिमान कशाशी खातात हे माहिती नाही. त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार आहे. स्वाभिमान या शब्दाची त्यांनी विटंबनाच केल्याचे राऊत म्हणाले.
स्वाभिमान या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही असे सांगून ते म्हणाले, सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने राणे सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते काल काय बोलले हे आज विसरतात व आज काय बोलतील ते उद्या विसरतील. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
(पान १ वरून) लागला. ज्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही. स्वाभिमान कशाशी खातात हे माहिती नाही. त्यांच्याकडून कोण काय अपेक्षा ठेवणार आहे. स्वाभिमान या शब्दाची त्यांनी विटंबनाच केल्याचे राऊत म्हणाले.
स्वाभिमान या नावाने पक्ष काढण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही असे सांगून ते म्हणाले, सर्व बाजूंनी कोंडी झाल्याने राणे सध्या संभ्रमावस्थेत आहेत. ते काल काय बोलले हे आज विसरतात व आज काय बोलतील ते उद्या विसरतील. ते ज्या पक्षात जातात तेथे भांड्याला भांडे लावत नाहीत तर भांडेच फोडून टाकतात. त्यामुळे भाजपने त्यांना दूर ठेवले असावे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.
ठाकरेंपुढे लोटांगणासाठी
तयार होते राणे
राणेंना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास सेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे सांगितले जात होते. आता राणेंचा स्वतंत्र पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असून राणेंना मंत्रीपदही मिळणार असल्याची चर्चा आहे, त्याबाबत सेनेचे म्हणणे काय, असे विचारता त्याबाबतचा निर्णय हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. मात्र भाजपमध्ये जाण्यास राणेंना सेनेने कधीही अडविले नव्हते. एककाळ असा होता की राणे उद्धव ठाकरेंसमोर लोटांगणही घालायला तयार होते, असे राऊत म्हणाले.