खाऊगल्लीतील हातगाड्या पुन्हा हटवल्या

By admin | Published: September 2, 2014 11:29 PM2014-09-02T23:29:46+5:302014-09-02T23:29:46+5:30

नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचे आदेश

The handcuffs in the Khagglali have been removed again | खाऊगल्लीतील हातगाड्या पुन्हा हटवल्या

खाऊगल्लीतील हातगाड्या पुन्हा हटवल्या

Next

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने मंगळवारी सकाळपासूनच मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहानजीक असलेल्या नगरपरिषद संकुलासमोरील रस्त्यालगतच्या खाऊगल्लीतील सर्व २० खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्या हटविण्यात आल्या. या गाड्यांना नाट्यगृहाच्या पाठीमागील भागात पर्यायी जागा देण्याचे आदेश नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी दिले आहेत.
गेल्या तीन वर्षांच्या काळात नाट्यगृहाजवळील खाऊगल्ली अनेकदा वेगवेगळ्या जागेवर हलविण्यात आली. तपासणीअंती त्यावेळी २० पैकी केवळ ५ जणांंकडेच पालिकेचा परवाना होता. त्यांच्याकडूनच पालिकेला कर भरला जात होता.
अन्य विक्रेते करचुकवेगिरी करीत असल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र आपण पुढाऱ्यांना दरमहिन्याला पैसे देत असल्याचे त्यावेळी काही विक्रेत्यांनी सांगितल्याने अनेक नगरसेवकही अडचणीत आले होते. कर भलत्याच ठिकाणी जात असल्याचे निदर्शनास येताच या विक्रेत्यांना गाड्या लावण्यासही पालिकेने मनाई केली होती. त्यानंतर या विक्रेत्यांनी पालिकेची मनधरणी करीत करभरणा केला होता. काही पुढाऱ्यांनी त्यासाठी शिष्टाई केली होती.
आता पुन्हा एकदा खाऊगल्लीचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या वर्षभरापासून खाद्यविक्रेत्यांच्या गाड्या मारुती मंदिर संकुलाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूने लावल्या जात होत्या. याठिकाणी सायंकाळनंतर खवैय्यांची खूप गर्दी होत असे.
आज या सर्वच गाड्या याठिकाणावरून हटविण्यात आल्याने खाऊ गल्लीची जागा सुनीसुनी दिसुन येत होती. या सर्व गाड्या हटविल्यानंतर या संकुलाची तातडीने साफसफाई करण्याचे आदेश नगराध्यक्ष मयेकर यांनी संबंधितांना दिले आहेत. गेल्या चार वर्षात खाऊगल्लीतील गाड्या हटवून जागा बदलण्याची ही पाचवी वेळ आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The handcuffs in the Khagglali have been removed again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.