दिव्यांगाच्या जीवनात फुलला आनंद; समिता अन् विजय अडकले विवाहबंधनात

By मेहरून नाकाडे | Published: June 2, 2023 03:34 PM2023-06-02T15:34:28+5:302023-06-02T15:35:34+5:30

दोघेही दिव्यांग मात्र चिकाटीने सुरु आहे स्वबळावर वाटचाल

Happiness blooms in the life of a disabled person; Samita and Vijay got stuck in marriage | दिव्यांगाच्या जीवनात फुलला आनंद; समिता अन् विजय अडकले विवाहबंधनात

दिव्यांगाच्या जीवनात फुलला आनंद; समिता अन् विजय अडकले विवाहबंधनात

googlenewsNext

रत्नागिरी : दाेन्ही पायांनी अधू मात्र इच्छाशक्ती प्रचंड, जिद्द, श्रम, चिकाटीने समिता कुळ्ये हिने (सोलगाव) दुकान व ब्युटीपार्लर सुरू केले आहे. विशेष म्हणजे समिताची वाटचाल स्वबळावर सुरू आहे. विजय बाईत (शीळ) सुध्दा एका पायाने दिव्यांग मात्र तरीही मुंबईत खासगी नोकरी करून कुटूंबाचा आधार ठरला आहे. मात्र दोघांची मने जुळली व विवाह बंधनात बांधले गेले. त्यांना शुभाशिर्वाद देण्यासाठी समाजातील विविध स्तरातील मंडळी उपस्थित होती.

रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनतर्फे दिव्यांगांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना खऱ्या अर्थाने योग्य दिशेकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन देते. तसेच त्यांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्नशील असते. दिव्यांगांचे अनेक प्रश्न सोडवताना दिव्यांगांचे लग्न म्हणजे दुर्मिळ गोष्ट निदर्शनास आली. प्रथमतः संस्थेचे अध्यक्ष एस के नाकाडे हे डॉ. सुनीता पवार नाकाडे यांच्याशी विवाहबध्द झाले. या प्रेरणेतून अनेक दिव्यांगांनाही लग्नाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते याची जाणीव झाली. काही वर्षातच अनेक विवाह जुळून झाले. 

अशाच प्रकारे संस्थेची सभासद सोलगाव येथील समिता कुळये हिच्यासाठी लग्न ही संकल्पनाच मैलो दूर होती. समिता जन्मताच एका पायाने दिव्यांग नंतर दुसऱ्या पायाचीही समस्या निर्माण झाली. समिता स्वतःच्या वेदनेत व असंख्य अडचणीत वेढलेली असताना जिद्दीने विविध संकटांना सामोरे जातानाच संस्थेशी जोडली गेली. त्यानंतर तिच्या जीवनात, विचारात अमूलाग्र बदल झाला. प्रत्येक दिव्यांगाला संस्थेच्या कुटुंबात सामील करून त्यांचेही जीवन तिने समृध्द केले. 

समिता सध्या रत्नागिरी जिल्हा पॅराप्लेजिकल फाऊंडेशनच्या राजापूर समन्वय समितीची अध्यक्षा आहे. तिचे काम पाहता तिच्याशी लग्नाचा निर्णय विजय बाईत यांनी घेतला. विचार जुळले, मने जुळली आणि दि.१ जून रोजी लग्नसोहळा नातेवाईक, ग्रामस्थ मित्रमंडळींच्या उपस्थित उन्हाळे येथे पार पडला. नवदांमप्त्यांच्या आनंदात नातेवाईक, मित्रमंडळी, संस्था सदस्य सहभागी झाले होते.

यावेळी सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा समितीचे शिलभद्र जाधव, श्रध्दा कळंबटे, प्रसाद फाटक, नारिशक्तीचे अशोक भुस्कुटे, आरएचपी फाउंडेशन संस्थेचे एस के नाकाडे , समीर नाकाडे, प्रिया बेर्डे, मानसी सावंत, संजीवनी शिंदे, लता चौगुले, फारुख मुल्ला, अक्षय चव्हाण, योगेश दहिवलकर उपस्थित होते.

Web Title: Happiness blooms in the life of a disabled person; Samita and Vijay got stuck in marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.