बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 04:43 PM2023-05-08T16:43:02+5:302023-05-08T16:43:26+5:30

बारसूच्या प्रस्तावित माळरानावर माती परीक्षणाच्या कामाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध

Harassment of local protesters in Barsu, Villagers started hunger strike | बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

बारसूतील स्थानिक आंदाेलकांचा छळ? ग्रामस्थांनी पुकारले उपाेषण

googlenewsNext

विनाेद पवार

राजापूर : प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरू असलेल्या माती परीक्षणाला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा प्रशासनाकडून छळ केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्या विरोधात गोवळ येथील श्री नवलादेवी मंदिराजवळ आज सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

बारसूच्या प्रस्तावित माळरानावर माती परीक्षणाचे काम सुरु आहे. या कामाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. माती परीक्षणाचे काम थांबविण्यासाठी सरसावलेले आंदोलक आणि पोलिस प्रशासन यांच्या झटापट झाली हाेती. त्यानंतर आराेप-प्रत्याराेपही झाले. बारसू येथील माती परीक्षणाच्या कामाला विरोध केला म्हणून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. काहींना तडीपारही केले.

या कारवायांमुळे आंदोलक संतापले आहेत. प्रशासनाकडून आंदाेलकांचा छळ हाेत असल्याचा आराेप ग्रामस्थांनी केला आहे. त्या विरोधात गोवळच्या निनादेवी मंदिराजवळ स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Harassment of local protesters in Barsu, Villagers started hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.