गोई बंधाऱ्याचे जलपूजन

By admin | Published: August 1, 2016 12:17 AM2016-08-01T00:17:41+5:302016-08-01T00:17:55+5:30

समाधान : ११३ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आल्यामुळे आनंद

Harijuna of the Goi Bandh | गोई बंधाऱ्याचे जलपूजन

गोई बंधाऱ्याचे जलपूजन

Next


 चांदवड : चांदवड येथे राष्ट्रीय महामार्गाजवळील गोई बंधाऱ्याचे जलपूजन चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक सोनुपंत ठाकरे व कदम माउली यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. पौरोहित्य भूषण दीक्षित यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, शिवसेना गटनेते व नगरसेवक जगन्नाथ राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, इंदूमती वाघ, पार्वताबाई पारवे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चना पूरकर, विलास दादा ढोमसे, बाळासाहेब वाघ, प्रशांत ठाकरे, सुनील डुंगरवाल, अनिल कोतवाल, बाळासाहेब कासलीवाल आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर असून, धरण क्षेत्रात वाढ करण्यासाठी परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी संपदित कराव्या लागणार आहे. यापैकी पूर्वी संपादित केलेल्या जमिनींचीअंदाजपत्रकातील किंमत एक कोटी ६ लाख व इतर कामाची अशी एकूण ती कोटी १० लाख रूपये किंतम होती. परंतु जमिनींच्या किमतीत वाढ झाल्याने सदर कामासाठी नवीन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा सांडवा लिकेज असल्याने त्याचे नवीन काम करून लिकेज बंद केल्याने बंधारा पूर्णपणे पाण्याने भरून सांडवा कोरडा पडला आहे. सदर काम हे प्रगतिपथावर असून, पिंचिग व सांडव्याचे काम साधारणत: मार्च २०१७पर्यंत पूर्ण होर्ईल. चांदवड नगर परिषदेच्या हद्दीतील गोई नदीच्या पूर्वेला साधारणत: ७५ टक्के ते पश्मिेला मंगरूळच्या बाजूस २५ टक्के भाग विभागला आहे. याचा फायदा चांदवड, मंगरूळ व जवळपासच्या खेड्यांना होणार आहे. यातून ११३ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असून, परिसरातील शेतकरीवर्ग आनंदित झाला आहे. याचबरोबर चांदवड शहरातील नागरिकांनी येथील पाणी आरक्षित करून चांदवडच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी केली आहे. यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्ष कासलीवाल यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास बाळासाहेब कबाडे, भगवान अप्पा कबाडे, हेमंत गुरव, गणपत ठाकरे, यमाजी देशमाने, अण्णा शेळके, पंडितराव तांदळे, कैलास कावळे, हांडगे, दिवटे, विशाल ललवाणी, नितीन खैरनार, अशोक अहेर, युवराज अहेर, मनोज शिंदे, प्रभाकर ठाकरे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन फंगाळ, गणेश पारवे, गणेश शेळके, राहुल हांडगे, शैलेश पवार, राजेंद्र बेलदार, अमोल अहेर, मुफिज शेख, अशोक बनकर, यशवंत बनकर आदिंसह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Harijuna of the Goi Bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.