हातखंबा शिमगोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:30 AM2021-03-28T04:30:19+5:302021-03-28T04:30:19+5:30
२) मानकऱ्यांनी होमात नारळ अर्पण केल्यानंतर गावातील शेट्ये-महाजन, सोनार, सुतार, देवळेकर, परीट, बोंबले, शिंदे हे सात कुंभ हातात मोठ्या ...
२) मानकऱ्यांनी होमात नारळ अर्पण केल्यानंतर गावातील शेट्ये-महाजन, सोनार, सुतार, देवळेकर, परीट, बोंबले, शिंदे हे सात कुंभ हातात मोठ्या काठ्या घेऊन होळीभोवती गोल फिरून मानकऱ्यांनी अर्पण केलेले नारळ बाहेर काढतात. सर्व नारळ एकत्रित करून ते वाणीपेठेतील चव्हाट्यावर आणले जातात व त्याचा प्रसाद करून भाविकांना दिला जातो.
३) होम झाल्यानंतर रात्री पुन्हा गाव होळीच्या शेंड्याखाली एकत्र येऊन गाऱ्हाणे घालण्यात येते. त्यानंतर तारवेवाडी, डांगेवाडी, सनगरेवाडी, बोंबलेवाडीतील ग्रामस्थांकडून नमन सादर केले जाते. यावर्षी कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करीत असतानाच पारंपरिक पद्धतीला गालबोट लागू नये यासाठी मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत नमन उभे करून गणपती सादर करून सांगता करण्यात आली.
४) दरवर्षी गावातील १६ कुंभ व १७ वे पाहुण्याच्या कुंभाकडे घरोघरी ग्रामदेवतेची पालखी येते. पाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र, यावर्षी कोरोनामुळे पालखी घरोघरी न नेता सहाणेवरच विराजमान होणार आहे. प्रत्येक कुंभांसाठी पालखीच्या दर्शनाकरिता नियोजन केले असून त्याचे पालन ग्रामस्थांकडून केले जाणार आहे.