दु:ख बाजूला सारून त्याने केले भावाचे नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:50 PM2018-07-15T23:50:58+5:302018-07-15T23:51:03+5:30

He looked down on the sorrow and made his brother's eyeball | दु:ख बाजूला सारून त्याने केले भावाचे नेत्रदान

दु:ख बाजूला सारून त्याने केले भावाचे नेत्रदान

googlenewsNext

अरुण आडिवरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ऐन तारुण्यात २७व्या वर्षी लोटे (ता. खेड) येथील प्राजक्त रविकिरण देवरुखकर याचे लोटे येथील रघुवीर घाटातील धबधब्यात पडून निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे भाऊ रणजीत रविकिरण देवरुखकर यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवत सामाजिक जाणीव जपत भावाचे नेत्रदान करुन एक आदर्श घडविला आहे.
प्राजक्त हा दि. १३ जुलै रोजी धबधब्यावर फिरायला गेला असता तेथे त्याचा अपघात झाला. डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याला कोल्हापूर येथे रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला. आपल्या लहान भावाच्या मृत्यूच्या दु:खात असूनही रणजीत देवरुखकर यांनी त्याचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.
सह्याद्री निसर्ग मित्रचे उदय पंडित, डॉ. ग. ल. जोशी, भाऊ काटदरे यांनी घरडा हॉस्पिटल, लोटे येथे जाऊन प्राजक्त देवरुखकर यांचे नेत्र (कॉर्निया) पंधरा ते वीस मिनिटात काढले. त्यानंतर खास एम. के. मिडीयम या औषधातून व विशेष बनवलेल्या अतिथंड बॉक्समधून त्वरित सांगली येथील दृष्टीदान आय बँक, डॉ. मिलिंद किल्लेदार यांच्याकडे पाठवले. सह्याद्री निसर्ग मित्र, चिपळूण डॉ. ग. ल. जोशी व इतर सर्व नेत्रतज्ज्ञांनी सुरू केलेल्या चळवळीला चालना मिळत
आहे.
चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्रच्यावतीने नेत्रदान चळवळ सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात ११ यशस्वी नेत्रदान झाली असल्याची माहिती ‘सह्याद्री निसर्ग मित्र’चे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी दिली.
जगात २० टक्के अंध भारतात
जगातील ३ कोटी ९० लाख अंध व्यक्तींपैकी २० टक्के म्हणजे ७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील ६० टक्के मोती बिंदुमुळे, तर २ टक्के कॉर्नियाच्या खराब होण्यामुळे आहे. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजाराची भर पडत असते. या १,५६,००० अंधांना जर नेत्रदानापासून कॉर्निया उपलब्ध झाला तर त्यांच्या जीवनातील अंधकार दूर होऊ शकतो.
कॉर्निया काढला जातो
नेत्रदान म्हणजे मृत्यूनंतर माणसाच्या डोळ्यामधील काळ्या बुबुळाची वरची १/२ मिलिमीटर जाडीची चकती (कॉर्निया) काढून ती अंध व्यक्तीला बसवणे, नेत्रदानात संपूर्ण डोळा काढला जात नाही. हे मृत्यूनंतर ६ तासात करणे आवश्यक असते. मृत व्यक्तीची संमती घेतली नसली तरी केवळ नातेवाईकांच्या संमतीने नेत्रदान करता येते.

Web Title: He looked down on the sorrow and made his brother's eyeball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.