राजीनामा देतो, त्यांनीच पक्ष वाढवावा

By admin | Published: June 12, 2016 11:36 PM2016-06-12T23:36:38+5:302016-06-13T00:11:57+5:30

भास्कर जाधव : वाद मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही; सावर्डेतील राष्ट्रवादीच्या बैठकीत वक्तव्य

He resigns, he should increase the party | राजीनामा देतो, त्यांनीच पक्ष वाढवावा

राजीनामा देतो, त्यांनीच पक्ष वाढवावा

Next

सावर्डे (जि. रत्नागिरी) : संघटनेत माझे ‘काहींशी’ असलेले वाद हे माझ्यामुळे झालेले नाहीत. त्यामुळे ते मिटविण्यासाठी माझ्याकडे वेळही नाही. अशा क्षुल्लक कामांसाठी मला वेळ नसतो. कुणाला यामुळे त्रास होत असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. ‘त्यांना’च पक्ष वाढवू द्या आणि बघा राष्ट्रवादी किती मजबूत होतो ते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा नवनियुक्त प्रभारी आमदार भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना खडसावले.
सावर्डे येथील कॉलेज आॅफ फॉर्मसीच्या सभागृहात रविवारी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनी भास्कर जाधव आणि रमेश कदम यांच्या वादाबाबत मनोगतातून भाष्य करताना ‘हे वाद मिटले पाहिजेत. अशा वादांमुळे कार्यकर्त्यांची गोची होते. या वादात कार्यकर्ता भरडला जातो’, असे सांगितले.
त्यावर उत्तर देताना जाधव म्हणाले, मला राष्ट्रवादीत शरद पवार यांनी मोठे केले आहे, त्यामुळे त्यांचा शब्दच मी प्रमाण मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे. त्यांना दिलेला प्रत्येक शब्द मी खरा करून दाखविला आहे. त्यामुळेच त्यांनीही माझ्यावर विश्वास टाकून विविध पदे दिली.


जाधव यांचा पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीला माजी राज्यमंत्री रवींद्र माने, खेड-दापोलीचे आमदार संजय कदम, प्रांतिक सदस्य नलिनी भुवड, प्रदेश चिटणीस बाबाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, विष्णुपंत सावर्डेकर, महिला जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, युवकचे जिल्हाध्यक्ष राजू आंब्रे, विक्रांत जाधव, कुमार शेट्ये, बशीर मूर्तुझा, अजित यशवंतराव, सभापती स्नेहा मेस्त्री, सुभाष मोहिते, सिकंदर जसनाईक, कृष्णा पाटील, मंडणगडच्या नगराध्यक्षा श्रृती साळवी उपस्थित होते. (वार्ताहर)


तालुकानिहाय मेळावे
यावेळी तालुकानिहाय मेळाव्यांचे नियोजन करण्यात आले. ते असे - २० जूनला सकाळी १० ते २ वा. मंडणगड, दुपारी ३ वा. दापोली, २१ जूनला सकाळी १० ते २ वा. खेड, २९ जूनला सकाळी १० ते २ वा. राजापूर, दुपारी ३ वाजता लांजा, ३० जूनला सकाळी १० ते २ वा. संगमेश्वर, २ जुलैला सकाळी १० वा. चिपळूण, ३ जुलैला गुहागर येथे सकाळी ११ वा. तालुका व जिल्हा शिबिर.
तालुकानिहाय मेळावे घेणार
सत्तेबाहेर राहून संघटना बांधणी मजबूत करा. तालुकाध्यक्षांनी तालुक्यात जाऊन तेथील पक्षवाढीसंदर्भात आढावा घ्यावा. येईल त्या व्यक्तीला पक्षात सामील करून आगामी निवडणुकीत पक्षाचा कार्यकर्ता पदावर बसवा आणि गावचा विकास करा, असे सांगतानाच तालुकानिहाय संघटनात्मक बांधणीसाठी मेळावे घेऊन जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मजबुतीकरण करून जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन त्यांनी केले.


पक्षवाढीसाठी कामाला लागा
आमदार जाधव मार्गदर्शन करताना म्हणाले की, पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार, माझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद पुन्हा एकदा वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे.
विरोधी पक्षाच्या सरकारने सत्तेवर आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विविध विकासात्मक कामांना खीळ घालून अनेक क्षेत्रात राज्याला मागे नेले आहे. पायाभूत सुविधा, तसेच तत्सम संबंधित योजना बंद करून सामान्य जनतेच्या
जिवाशी खेळ मांडला आहे, असा आरोपही जाधव
यांनी केला.

Web Title: He resigns, he should increase the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.