स्वमग्न मुलांमधील विशेष गुण ओळखून त्याला वाव द्यायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:33 AM2021-04-02T04:33:25+5:302021-04-02T04:33:25+5:30

फोटो मजकूर रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशनतर्फे २ एप्रिल या जागतिक स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित केलेल्या पोस्टरचे अनावरण पूर्वसंध्येला ...

He should be given space by recognizing the special qualities in the self-absorbed children | स्वमग्न मुलांमधील विशेष गुण ओळखून त्याला वाव द्यायला हवा

स्वमग्न मुलांमधील विशेष गुण ओळखून त्याला वाव द्यायला हवा

Next

फोटो मजकूर

रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशनतर्फे २ एप्रिल या जागतिक स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित केलेल्या पोस्टरचे अनावरण पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गुरुवारी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : स्वमग्न मुलांमध्ये निसर्गाने एक तरी विशेष गुण दिलेला असतो, तो शोधून आपण त्याला वाव दिल्यास ते खूप पुढे जाऊ शकतील, असे प्रतिपादन इंदुराणी जाखड यांनी केले. २ एप्रिल या जागतिक स्वमग्नता दिनाचे औचित्य साधून येथील आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेने जनजागृतीसाठी प्रदर्शित केलेल्या पोस्टरचे अनावरण पूर्वसंध्येला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

आस्था सोशल फाउंडेशन या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेत स्वमग्नता अर्थात ऑटीझमबाबत जाणीव जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यत: ऑटीझम काय आहे, ऑटीझमची लक्षणे बघून शक्य तितक्या लवकर ऑटीझमचे निदान होणे व पालकांकडून स्वीकार होणे आवश्यक असल्याने या प्रकारची पोस्टर आस्थातर्फे प्रदर्शित करण्यात आली. या पोस्टरचे अनावरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, समाज कल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, समाजकल्याण दिव्यांग साहाय्यता कक्षाचे आंबिवले उपस्थित होते.

या सर्वांनी आस्थाचे कार्य समजून घेतले व कार्याचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांना ऑटीझम जनजागृतीबाबत बॅचेस लावण्यात आले. निळे कपडे परिधान करून ऑटीझमला पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पोस्टरच्या प्रदर्शनानंतर इंदुराणी जाखड यांनी यापुढे जिल्हा परिषदमध्ये कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ न स्वीकारता विशेष गरजा असणाऱ्या मुलांनी बनवलेले कृत्रिम फुलांचे पुष्पगुच्छ स्वीकारले जातील. जेणेकरून या मुलांना मदत होईल, असे जाहीर केले. आस्थाचे कार्यकर्ते संकेत चाळके, कल्पेश साखरकर, संपदा कांबळे, शिल्पा गोठणकर, मयुरी जाधव, अनुष्का आग्रे, संघमित्रा कांबळे आणि आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे व फिजिओ थेरपिस्ट डॉ. श्रृष्टी भार्गव यांनी यावेळी आस्थाच्या कार्याबद्दल माहिती दिली.

Web Title: He should be given space by recognizing the special qualities in the self-absorbed children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.