आरोग्य केंद्रच ‘सलाईन’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 04:46 PM2017-09-03T16:46:23+5:302017-09-03T16:46:28+5:30
जाकादेवी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी, दोन शिपाई व १ लॅब टेक्निशियनच नाही, केवळ एका महिला वैद्यकीय अधिकाºयावरच परिसरातील २५ ते ३० गावातील रूग्ण अवलंबून आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग महत्त्वाच्या अशा लक्षवेधी आरोग्य केंद्राकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न उपस्थित करुन दोन वैद्यकीय अधिकारी तातडीने पुरवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीआहे.

वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. गुजलवार आणि डॉ. शिंदे यांची अन्यत्र बदली झाली. त्यांच्या जागी जाकादेवी येथे नियुक्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी केवळ दिवसाच काम पाहतात. रात्री या महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच नाही. गेले अनेक महिने या रिक्त पदामुळे सर्वसामान्य शेतकरी आजारी व्यक्तींची फार मोठी गैरसोय होऊ लागली आहे.
आरोग्य केंद्रच आजारी असल्याची प्रचिती या परिसराला येत आहे. त्यातच टेक्निशियन नसल्याने रक्ततपासणी केली जात नाही. रक्त घेऊन दोन दिवसांनी रत्नागिरीहून अहवाल येईल तेव्हा गरिबांवर उपचार होतात, तोपर्यंत असलेला आजार बळावतो. गंभीर स्थितीत रूग्णाला रत्नागिरी येथे जिल्ह्याच्या ठिकाणी हलवावे लागते.
जाकादेवी गणपतीपुळे - जयगड मार्गावर वारंवार अपघात होता. या अपघातात जखमी झालेल्यांना जाकादेवी येथून रत्नागिरीला हलवावे लागते. अत्यावश्यक असलेले १ लॅब टेक्निशियनपद रिक्त आहे. अशा शासकीय गैरसोयीमुळे येथील गोरगरीब रूग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागतो.