कुणबी विकास पतसंस्थेतर्फे आराेग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:29 AM2021-03-20T04:29:36+5:302021-03-20T04:29:36+5:30
.................. लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : येथील कुणबी विकास सहकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, लांजा ...
..................
लाेकमत न्यूज नेटवर्क
लांजा : येथील कुणबी विकास सहकारी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना, लांजा प्रकल्पातील सॅम व मॅम श्रेणीत येणाऱ्या कुपोषित बालकांचे आरोग्य तपासणी शिबिर साई मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, लांजा येथे पार पडले.
समाजातील कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आला.
या शिबिराला तालुक्यातील २७ मुलांची आरोग्य तपासणी बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण सुतार व बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज किंजळे यांच्यातर्फे करण्यात आली. यावेळी सर्व मुलांना मोफत विटॅमिन पावडर व औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण सुतार, बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज किंजळे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी स्वाती गाडे यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक शांताराम गाडे, नंदकुमार आंबेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे, अंगणवाडी सुपरवायझर रश्मी गोरे, तालुक्यातील अंगणवाडी सेविका, साई मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.