भाेपण गावात पाेलिसांकडून आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:32 AM2021-05-07T04:32:48+5:302021-05-07T04:32:48+5:30
दाभोळ : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रत्येक वाडीवस्तीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये पाेलीसही आता सक्रिय झाले असून, ...
दाभोळ : काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी प्रत्येक वाडीवस्तीवर विशेष खबरदारी घेतली जात आहे. यामध्ये पाेलीसही आता सक्रिय झाले असून, दापाेली तालुक्यातील भाेपण गाव पाेलिसांनी दत्तक घेतले आहे. या गावातील ग्रामस्थांची आराेग्य तपासणी करण्याबराेबरच त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची माेहीमही हाती घेतली आहे.
भाेपण हे गाव कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याने दत्तक घेऊन अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दाभोळ सागरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव, उपनिरीक्षक गणेश सावर्डेकर, मेजर महेश टेमकर व कर्मचाऱ्यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गावात जाऊन प्रत्येक कुटुंबातील नागरिकांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये कोणती लक्षणे आढळून येत असतील तर योग्य ती खबरदारी घेत आहेत. ग्रामपंचायतीच्या साहाय्याने गावात बैठक घेऊन लोकांमध्ये कोरोना प्रादुर्भावाविषयी जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. सरपंच अर्चना हरेकर, उपसरपंच परशुराम बोबडे, सागर मोरे आणि सदस्य, पोलीस पाटील संजय खळे, ग्रामसेवक नटवे, अंगणवाडीसेविका, आशासेविका, ग्रामकृतीदल यांचा सहकाऱ्यांनी प्रत्येक वाडीमध्ये टीम नेमून घरोघरी जाऊन विशेष काळजी घेत योग्य माहिती देत आहेत.
........................................
दापाेली तालुक्यातील भाेपण गावात पाेलिसांकडून ग्रामस्थांची तपासणी करण्यात येत आहे. (छाया : राजू वाडकर)