आरोग्य विभाग : नागरिकांनी सावधान राहण्याचे आवाहन
By admin | Published: August 28, 2014 09:10 PM2014-08-28T21:10:32+5:302014-08-28T22:20:26+5:30
चिपळूणात विविध ठिकाणी आरोग्य पथक तैनात केले असून, यामध्ये वहाळफाटा, उक्ताड फाटा, रेल्वेस्टेशन, बहादूरशेख नाका आदी ठिकाणी साथ रोग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात
अडरे : ‘इबोला’ संसर्गजन्य आजाराचे परदेशात काही संशयित रुग्ण आढळल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक केंद्रांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. इबोला या आजाराबाबत जनजागृती करण्याची सूचनाही प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. आफ्रिकेतील गिनीमध्ये ‘इबोला’चा संसर्ग वाढला आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाला केंद्र व राज्य स्तरावरुन सतर्कतेचा आदेश देण्यात आला असून नागरिकांनी घ्यावयाची काळजी, रोग व लक्षणे, प्रतिबंधक उपाय यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. सांधेदुखी, ताप, उलटी, जुलाब या आजाराची लक्षणे आढळल्यास कुटीर उपजिल्हा रुग्णालय कामथे तसेच तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. गणेशोत्सव असल्याने चिपळूणात विविध ठिकाणी आरोग्य पथक तैनात केले असून, यामध्ये वहाळफाटा, उक्ताड फाटा, रेल्वेस्टेशन, बहादूरशेख नाका आदी ठिकाणी साथ रोग नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली. (वार्ताहर)