पाेलिसांच्या आराेग्याचीही घेतली जाते काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:31 AM2021-05-10T04:31:57+5:302021-05-10T04:31:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी नागरिकांची घराेघरी जाऊन आराेग्य तपासणी करण्यात येत आहे. त्याचबराेबर दिवसरात्र रस्त्यावर ...

The health of the Paelis is also taken care of | पाेलिसांच्या आराेग्याचीही घेतली जाते काळजी

पाेलिसांच्या आराेग्याचीही घेतली जाते काळजी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी नागरिकांची घराेघरी जाऊन आराेग्य तपासणी करण्यात येत आहे. त्याचबराेबर दिवसरात्र रस्त्यावर बंदाेबस्तासाठी उभ्या असणाऱ्या पाेलिसांच्याही आराेग्याची काळजी घेण्याचे काम पाेलीस दलाकडून सुरू आहे.

काेराेनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातील काेराेनाबाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी पाेलीस दलही सक्रिय झाले आहे. पाेलिसांकडून दत्तक गाव घेऊन ग्रामस्थांची तपासणी करण्यात येत आहे तसेच लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर बंदाेबस्तासाठीही पाेलीस सज्ज आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे धाेरण पाेलिसांनी स्वीकारले आहे.

रस्त्यावर बंदाेबस्तासाठी असणाऱ्या पाेलिसांनाही काेराेनाचा संसर्ग हाेण्याची भीती आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलीस दलातील कर्मचारी किंवा अधिकारी कोरोनाबाधित हाेऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग यांनी जे कर्मचारी किंवा अधिकारी नाकाबंदीच्या ठिकाणी असतात अशांची रोज सकाळी व संध्याकाळी तापमान व ऑक्सिजन पातळी तपासणी केली जात आहे. लाॅकडाऊन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून ही तपासणी करण्यात येत आहे. जनतेच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या पाेलिसांचेही आराेग्य चांगले राहण्यासाठी पाेलीस दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे.

-------------------------

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील नाकांबदीच्या ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांचे तापमान व ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत आहे. (छाया : तन्मय दाते)

Web Title: The health of the Paelis is also taken care of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.