चिपळूण शहरात आराेग्य तपासणीत आढळले पाच पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:30 AM2021-05-15T04:30:10+5:302021-05-15T04:30:10+5:30

अडरे : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत चिपळूणमध्ये ‘माझ्या कुटुंबाची काळजी’ हा उपक्रम चिपळूण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबवण्यात ...

Health test in Chiplun city found five positives | चिपळूण शहरात आराेग्य तपासणीत आढळले पाच पाॅझिटिव्ह

चिपळूण शहरात आराेग्य तपासणीत आढळले पाच पाॅझिटिव्ह

Next

अडरे : ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत चिपळूणमध्ये ‘माझ्या कुटुंबाची काळजी’ हा उपक्रम चिपळूण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत आहे. शहरातील १३ प्रभागात जाऊन घरांचे सर्वेक्षण करून गृहभेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आरोग्य पथकाने २६८८ लोकांचे सर्वेक्षण केले. या तपासणीत पाच पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. यातील एक कोविड केअर सेंटरमध्ये, तर चार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

या पथकाने ९५६ कुटुंबांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये १८६७ व्यक्तींचे तापमान तपासणी करण्यात आली. तसेच ६६० नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारी म्हणून ही मोहीम जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सगळीकडे राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील १३ प्रभागात १३ आरोग्य पथकांतर्फे दोन आशा सेविका, एक अंगणवाडी सेविका व नगरपालिका कर्मचारी घरोघरी जाऊन घरांचे सर्वेक्षण करत आहेत. ही तपासणी मोहीम नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

शहरातील २४६ घरे बंद

चिपळूण शहरातील नागरिकांची आराेग्य तपासणी माेहीम जाेरात सुरू असून, नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या तपासणीदरम्यान प्रत्येक घरात जाऊन माहिती गाेळा करण्यात येत आहे. ही तपासणी करत असताना शहरातील २४६ घरे मात्र बंद हाेती़. या बंद घरांतील नागरिक काेठे आहेत, याची माहिती घेण्यात येत आहे.

Web Title: Health test in Chiplun city found five positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.