रत्नागिरीत चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:28 AM2023-09-12T11:28:47+5:302023-09-12T11:29:08+5:30
रत्नागिरी : पावसाने शुक्रवारपासून जिल्ह्यात संततधार ठेवली होती. सोमवारी चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. दिवसभर ऊन - पावसाचा ...
रत्नागिरी : पावसाने शुक्रवारपासून जिल्ह्यात संततधार ठेवली होती. सोमवारी चौथ्या दिवशीही पावसाचा जोर कायम होता. दिवसभर ऊन - पावसाचा खेळ सुरू असला तरी रात्री तसेच पहाटेपासून सकाळपर्यंत पाऊस चांगला पडत आहे. सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याने, या पावसाने नागरिकांना काही अंशी दिलासा दिला आहे.
ऑगस्ट महिन्यात निराशा केलेल्या पावसाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मात्र चांगली सुरूवात केली. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत पावसाची संततधार कायम होती. या पावसाने गेल्या वर्षीच्या या कालावधीतील पावसाची सरासरी ही ओलांडली. त्यामुळे नागरिकांना पाऊस आताच गायब होती की काय, ही वाटत असलेली भीती दूर झाली.
रविवारपासून ऊन-पाऊस असे चित्र असले तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी जोरदार सरी पडत आहेत. त्यामुळे पावसाच्या पुनरागमनानंतर नागरिकांना हायसे वाटू लागले आहे. सध्या पडत असलेला पाऊस समाधानकारक असल्याने गेल्या तीन महिन्यात निराशा केलेल्या पावसाने आता सप्टेंबर महिन्यात तरी सातत्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.