चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 08:05 AM2022-07-05T08:05:37+5:302022-07-05T08:06:23+5:30

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत

Heavy Rain in Chiplun, Old Bhairi temple road under water, traffic jam | चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

चिपळूण जलमय; जुना भैरी मंदिर रस्ताही पाण्याखाली, वाहतूक ठप्प

googlenewsNext

चिपळूण : शहरासह तालुक्यात सोमवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे चिपळूण जलमय झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावरील डीबीजे महाविद्यालय परिसरात तीन फुटांपर्यंत पाणी साचल्याने चक्क महामार्गाला नदीचे रूप आले हाेते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाशिष्ठी नदीतून उपसा केलेला गाळ शहरातील जुना कालभैरव मंदिर परिसरात टाकल्याने येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

गेले काही दिवस चिपळुणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहेत. शहरातील काही भागात तुंबलेल्या नाल्यांमुळे शहरवासीयांना फटका बसला. या पावसात मुंबई-गोवा महामार्गावर डीबीजे महाविद्यालय परिसरात चक्क तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याठिकाणी अरुंद मोऱ्या टाकल्याने ओझरवाडी येथील डोंगराचे वाहून येणारे पाणी अडते. त्यामुळे याठिकाणी रुंद मोऱ्या उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच चौपदरीकरणांतर्गत दोन्ही बाजूंनी गटारे उभारली असली तरी परिसरातील सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्याचा फटका दरवर्षी बसत असल्याने नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग व नगर परिषदेला वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसामुळे जुना काल भैरव मंदिर परिसरात टाकलेल्या भरावामुळे मंदिर ते जिप्सी कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले 
आहे. त्यामुळे हाही मार्ग बंद पडला आहे. तसेच सावर्डे - कापसाळ रस्त्यावर पाणी भरले आहे. 

काही तालुक्यांत रिपरिप
रत्नागिरी : रविवारी दडी मारलेल्या पावसाने सोमवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जोरदार पडण्यास सुरुवात केली तर काही तालुक्यांमध्ये रिपरिप सुरू हाेती. पाऊस सुरू झाल्याने शेतकरी हरखले असून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना आता गती येणार आहे. दरम्यान, गेल्या २४ तासातील पावसाची सरासरी नोंद २० मिलीलीटर झाली असली तरी दुपारी पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता. सकाळपासून जोरदार सरी कोसळू लागल्याने पाऊस नियमित होईल, असे वाटत होते; मात्र रविवारी पुन्हा पावसाने दडी मारली. दिवसभरात सरी कोसळत होत्या.

परशुराम घाटात यंत्रणा तैनात
मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात काही ठिकाणी छोटे-मोठे दगड रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा घाटात तैनात करण्यात आली आहे. घाटातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी माती रस्त्यावर आल्याने भीती व्यक्त होत आहे.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ
जिल्ह्यात काेसळलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चिपळूण तालुक्यातील वाशिष्ठी, खेड तालुक्यातील जगबुडी आणि लांजा तालुक्यातील काजळी नदीचे पाणी वाढले आहे. या नद्या इशारा पातळीवरुन वाहत आहेत.

 

Web Title: Heavy Rain in Chiplun, Old Bhairi temple road under water, traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.