रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 03:34 PM2020-09-23T15:34:58+5:302020-09-23T15:37:09+5:30

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे.

Heavy rain in Ratnagiri | रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊसचिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात घरांचे किरकोळ नुकसान

रत्नागिरी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस पडत आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण चांगले आहे. रविवार २० सप्टेंबरच्या सायंकाळपासून पावसाने आपली संततधार कायम ठेवली आहे.

या पावसात सातत्य असले तरी त्यात जोर नसल्याने सुदैवाने कोठेही पूरस्थिती नाही. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात झालेले घरांचे किरकोळ नुकसान वगळता कोठेही पावसामुळे समस्या नाही.

Web Title: Heavy rain in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.