रत्नागिरीत रात्रभर मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:30 PM2017-10-03T14:30:39+5:302017-10-03T14:33:29+5:30

सोमवारी सायंकाळपासून ढगांच्या गडगडाटात सुरू झालेल्या पावसाने रात्रभर कहर केला. प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस सुरूच होता. सोमवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरात वीज पडल्यामुळे नित्यानंद दळवी यांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

Heavy rain in Ratnagiri overnight | रत्नागिरीत रात्रभर मुसळधार पाऊस

रत्नागिरीत रात्रभर मुसळधार पाऊस

Next
ठळक मुद्देवीज पडून विद्युत उपकरणे जळालीसंगमेश्वर, लांजा, चिपळूणसह अनेक ठिकाणी पावसाने लावली हजेरी

रत्नागिरी, दि. ३ : सोमवारी सायंकाळपासून ढगांच्या गडगडाटात सुरू झालेल्या पावसाने रात्रभर कहर केला. प्रचंड गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस सुरूच होता. सोमवारी रात्री रत्नागिरी शहरातील झाडगाव परिसरात वीज पडल्यामुळे नित्यानंद दळवी यांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळपासून मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे.


गेले अनेक दिवस पावसाने सातत्य ठेवले आहे. रोज सायंकाळच्या वेळेत पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारीही सायंकाळी गडगडाटासह पावसाने आगमन केले. केवळ रत्नागिरीच नाही तर संगमेश्वर, लांजा, चिपळूणसह अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सोमवारी रात्रभर प्रचंड गडगडाटात पाऊस पडत होता.


सोमवारी रात्री याच पावसात रत्नागिरीच्या झाडगाव एमआयडीसी भाग वीज पडली. त्यात नित्यानंद दळवी यांच्या घरातील फ्रीज, पंख्यासह काही विद्युत उपकरणे जळाली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

 

Web Title: Heavy rain in Ratnagiri overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.