मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:30 AM2021-06-17T11:30:37+5:302021-06-17T12:03:55+5:30

Rain Ratnagiri-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Heavy rains cause pain in Ratnagiri; Warning of heavy rain for next 3 days | मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देमुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळलीपुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा

रत्नागिरी-राज्यातील काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोपडले आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीच्या निवळी घाटात दरड कोसळली. यामुळे मध्यरात्री २ वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

माहितीनुसार, आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली नाही आहे. दरम्यान पुढील ३ दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. २० जूनपर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.

गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पुराचे पाणी वस्तीत आणि शेतात घुसले आहे.

आता कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.काल, बुधवारी रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री ,सोनवी, मुच्कुंडी, बावनदी इ. नद्या ओसंडून वाहत असून धोक्याच्या पातळीवर जाऊन पोहोचल्या होत्या. पण रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही. तरी काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दरम्यान चिपळूणमध्ये रात्रभरापासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी पहाटे ३ वाजता शिरण्यास सुरुवात झाली होती. पण पावसाचा जोर ओसरल्याने पुराचा धोका टळला. आज सकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस सुरू आहे. जोर कमी असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. पण तरीही हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. समुद्रलगतच्या रहिवाशांना इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Heavy rains cause pain in Ratnagiri; Warning of heavy rain for next 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.