चिपळुणातील पूर्वविभागात धुवाधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:29 AM2021-04-12T04:29:13+5:302021-04-12T04:29:13+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील शिरगाव व सह्याद्री खोऱ्यातील परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजता मेघ गर्जनेसह धुवाधार पाऊस ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील शिरगाव व सह्याद्री खोऱ्यातील परिसरात रविवारी सायंकाळी ५ वाजता मेघ गर्जनेसह धुवाधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाला बसला आहे.
चिपळूणच्या काही भागात शुक्रवारपासून पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली हाेती. शनिवारी सायंकाळी ७ वाजता शहर व परिसरात पावसाचा शिडकावा झाला. मात्र, त्यानंतर दाटलेले ढग गायब झाले. रविवारी दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता. अशातच सायंकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील शिरगाव, पोफळी, अलोरे व पूर्व विभागातील अन्य भागात मुसळधार पाऊस कोसळला.
सध्या आंब्याला पाेषक वातावरण असताना पुन्हा पाऊस कोसळल्याने बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी सुरू केली हाेती. त्यावरही पावसाने पाणी फेरले आहे.