जिवलग योजनेतून कुर्णे दाभोलकर कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:15+5:302021-07-23T04:20:15+5:30
लांजा : राष्ट्रवादीची जिवलग योजना कुर्णे येथे राबवण्यात आली. या याेजनेंतर्गत कोरोनामुळे ...
लांजा : राष्ट्रवादीची जिवलग योजना कुर्णे येथे राबवण्यात आली. या याेजनेंतर्गत कोरोनामुळे ज्यांचे आई व वडील दोघांचे निधन झाले, अशा अनाथांना आधार दिला जात आहे. लांजा तालुक्यातील कुर्णे येथील कोरोनामध्ये निधन झालेले रमेश दाभोलकर यांच्या मुलांची खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंद घेऊन मदत दिली.
दाभोलकर कुटुंबाची सर्व परिस्थिती दाजी गडहिरे यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली हाेती. या मुलांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून जास्तीत जास्त मदत करावी, अशी मागणी केली हाेती. यामुळे यापुढे रिया दाभोलकर, वरुण दाभोलकर व शर्वरी दाभोलकर यांचे पालक म्हणून राष्ट्रवादी जिवलग टीम जबाबदारी पार पाडणार आहे.
यावेळी युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे, महिला तालुकाध्यक्ष स्वप्ना सावंत व सामाजिक न्याय सेल माजी तालुकाध्यक्ष दाजी गडहिरे हे उपस्थित होते.