सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:36 AM2021-08-17T04:36:47+5:302021-08-17T04:36:47+5:30
राजापूर : शहरातील दिवाणी न्यायालयासमोर युवा व्यावसायिक अभियंता नरेंद्र पावसकर यांच्या नरेंद्र पावसकर यांच्या नरेंद्र इन्फोटेक या ...
राजापूर : शहरातील दिवाणी न्यायालयासमोर युवा व्यावसायिक अभियंता नरेंद्र पावसकर यांच्या नरेंद्र पावसकर यांच्या नरेंद्र इन्फोटेक या संगणक विक्री दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्याला शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने आर्थिक मदत करण्यात आली.
दुहेरी त्रास सुरू
रत्नागिरी : यंदाही मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे भरण्यासाठी खडी आणि मातीचा भराव केला जात आहे. त्यामुळे ऊन पडले तर धूळ आणि पाऊस असेल तर चिखल असा दुहेरी त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
पावसाळ्यातही टँकर
खेड : तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून अनेक ठिकाणी नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. दोन शासकीय व चार खासगी योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे २५ जुलैपासून ८ गावांमध्ये टँकर धावत आहेत. त्यामध्ये २ शासकीय व ४ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
जनावरांचा धोका
रत्नागिरी : शहरात असणाऱ्या शासकीय निवासस्थानांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात रान वाढले आहे. या परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा धाेका वाढला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शहरातील माळनाका येथे बांधकाम विभागाच्या असणाऱ्या शासकीय निवासस्थान परिसरात मोठ्या प्रमाणात रान वाढले आहे.
कर्जमाफीची मागणी
पावस : कोकणचा हापूस आंबा त्याची दयनीय अवस्था झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी प्रकाश साळवी यांनी केली आहे. पावसमध्ये हापूस आंबा बागायतदारांची नुकतीच सभा झाली. यावेळी अध्यक्ष साळवी यांनी ही मागणी केली. भविष्यात येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असू देत, जर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळाला नाही तर मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.