खेडमध्ये पूरग्रस्तांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:09+5:302021-08-13T04:36:09+5:30

खेड : दापोली तालुक्यातील टेटवली गावातील ऐनरकर मोहल्ल्यातील ऐनव्हील वेल्फेअर सोसायटी या संस्थेने सामाजिक बांधीलकी जपत सलग १२ ...

Helping flood victims in Khed | खेडमध्ये पूरग्रस्तांना मदत

खेडमध्ये पूरग्रस्तांना मदत

Next

खेड : दापोली तालुक्यातील टेटवली गावातील ऐनरकर मोहल्ल्यातील ऐनव्हील वेल्फेअर सोसायटी या संस्थेने सामाजिक बांधीलकी जपत सलग १२ दिवस पूरग्रस्तांसाठी श्रमदानातून व साहित्य पुरवठ्यातून मदत केली आहे.

बुरोंडी मार्गावर एसटी बससेवा सुरू

दापोली : बुरोंडी गावाकडे जाणारा रस्ता खचल्यामुळे बंद करण्यात आलेली बससेवा अखेर २० दिवसांनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे बुरोंडीकडे जाणारा रस्ता खचला होता. त्यामुळे ही एसटी बससेवा बंद ठेवण्यात आली होती.

पूग्रस्तांना मदतीचा हात

चिपळूण : शिवसेनेच्या वतीने युवासेना खेड विभागप्रमुख नीलेश आवले यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. आवळे यांनी धान्याच्या किटचे वाटप केले. कोलेखाजन चव्हाणवाडी, कदमवाडी येथे या किटचे वाटप करण्यात आले.

तांडावस्ती सुधार योजनेमध्ये समावेश

खेड : महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचा सुधारित शासन निर्णय ३० जानेवारी २०१८ या दिवशी मंजूर करण्यात आला. या शासन निर्णयात तांडावस्ती सुधार योजनेच्या लाभात प्रथमच धनगर समाजाचा समावेश करण्यात आला आहे.

देवरुख : राज्य शासनाने दिलेेल्या हक्काच्या आरक्षणामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीत महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात पतीदेवांचा हस्तक्षेप वाढत असून महिला सरपंचांचे महत्त्व हळूहळू कमी होऊ लागले आहे.

Web Title: Helping flood victims in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.