चिपळुणातील १५० पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:24+5:302021-07-30T04:33:24+5:30
चिपळूण : महापूर आणि त्यानंतर पूरग्रस्तांसमोर उभे राहिलेले प्रश्न यांची सावर्डे येथील सावर्डेकर कुटुंबीयांनी गांभीर्याने दखल घेत १५० पूरग्रस्तांना ...
चिपळूण : महापूर आणि त्यानंतर पूरग्रस्तांसमोर उभे राहिलेले प्रश्न यांची सावर्डे येथील सावर्डेकर कुटुंबीयांनी गांभीर्याने दखल घेत १५० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह कपड्यांचे वाटप करून दिलासा दिला आहे.
या महापुरामुळे चिपळूणवासीयांचे जीवनच उद्ध्वस्त झाले असून, या सर्वांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. घरातील गृहोपयोगी वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत. या पूरग्रस्तांसाठी राजकीय पक्षांसह स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींचे हात मदतीसाठी सरसावले आहेत. यामध्ये सावर्डे येथील विष्णुपंत सावर्डेकर, सुरेश सावर्डेकर, चंद्रकांत सावर्डेकर, सतीश सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, मारुती सावर्डेकर, रोहित सावर्डेकर या सर्वांनी एकत्रितपणे येऊन चिपळुणातील १५० पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट व कपडे यांचे वाटप करून या पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. ही मदत मार्कंडी, काविळतळी, कोलेखाजण येथील पूरग्रस्तांना दिली आहे. सावर्डेकर कुटुंबीयांनी सामाजिक दायित्व जपून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.