चिपळूण पूरग्रस्तांना ॲम्ब्युलन्स असोसिएशनकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:33 AM2021-07-30T04:33:02+5:302021-07-30T04:33:02+5:30
रत्नागिरी : अचानक उद्भवलेल्या पुरात चिपळूण आणि परिसरातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली. खाण्यासाठी व प्यायला पाणी नाही. अशावेळी मानवतेच्या ...
रत्नागिरी : अचानक उद्भवलेल्या पुरात चिपळूण आणि परिसरातील अनेक घरे उद्ध्वस्त झाली. खाण्यासाठी व प्यायला पाणी नाही. अशावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी ॲम्ब्युलन्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासहित मदतीला धावून गेले.
चिपळूण येथे मुरादपूर, पेठ माप, पागनाका, मार्कंडी, चिपळूण बाजारपेठ, खेर्डी, समर्थ नगर सतीची वाडी या ठिकाणी नागरिकांना बिस्किटे, पाणी बॉटल, बेडशीट, दूध, फरसाण, मेणबत्ती, माचिस, मच्छर अगरबत्ती व लहान मुलांसाठी खाऊ इत्यादी वस्तूंची मदत करून रत्नागिरी ॲम्ब्युलन्स असोसिएशनने खारीचा वाटा उचलला आहे.
यासाठी महाशक्ती ॲम्ब्युलन्स कोकण विभाग प्रमुख तन्वीर जमादार, सदस्य भाई मयेकर, अजीम फकीर, शिरी किर, जुबेर जमादार, तुषार साळवी, योगेश उत्तेकर, गणेश गोराठे, डॉ. रोहन आंबवकर, हेमंत जोशी, सज्जन लाड, तोफिक काजी, तसवर खान, फिरोज पावस्कर यांचे सहकार्य लाभले. डॉ. पद्मजा कांबळे व पांडुरंग (पांड्या) झापडेकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.