पूरग्रस्तांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:04+5:302021-08-27T04:34:04+5:30
रत्नागिरी : भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटतर्फे चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेगड्या, एलईडी ट्यूबसह ...
रत्नागिरी : भारतीय विमा कर्मचारी सेना एलआयसी युनिटतर्फे चिपळूण पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. शेगड्या, एलईडी ट्यूबसह अन्य साहित्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. बहादूर शेख नाका येथील स्वामी मंगल कार्यालयात मदत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
स्वच्छता पंधरवडा
रत्नागिरी : नेहरू युवा केंद्र रत्नागिरीतर्फे स्वच्छता पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत पाेस्टर वाटप, श्रमदान, स्वच्छता शपथ, वृक्षारोपण, चित्रकला व निबंध स्पर्धा आणि जनजागृती आदी कार्यक्रम करण्यात आले.
शेरवली-टेटवली रस्त्याची चाळण
खेड : तालुक्यातील शेरवली संगलट आणि दापोली तालुक्यातील टेटवली, वाकवली गावांना जोडणाऱ्या मार्गावर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. हा रस्ता खड्ड्यात की, रस्त्यावर खड्डे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
प्रभारी गटविकास अधिकारीपदी पाटील
खेड : पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारीपदी ठाणे जिल्ह्यातील शहापूर पंचायत समितीत सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुशांत पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गटविकास अधिकारी अरुण जाधव यांनी ३१ जुलै रोजी निवृत्ती घेतल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
बाप्पाचे आगमन खड्ड्यातून होणार
दापोली : तालुक्यातील गावोगावच्या रस्त्यांना खड्डे पडले असल्याने यावर्षीही भक्तगणांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. गणपती बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यासाठी भक्तगणांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, यंदाही बाप्पाचे आगमन खड्डेमय रस्त्यावरून होणार असल्याने भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.