मातोश्री सेवाधाम ट्रस्टतर्फे मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:31 AM2021-05-18T04:31:48+5:302021-05-18T04:31:48+5:30
रत्नागिरी : मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी राज्यातील काही कोविड केअर सेंटरना औषधे व संरक्षक सामुग्री ...
रत्नागिरी : मातोश्री ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांनी राज्यातील काही कोविड केअर सेंटरना औषधे व संरक्षक सामुग्री मदत म्हणून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर व मातोश्री ट्रस्टचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अरविंद मालाडकर यांच्या विनंती रत्नागिरी नगरपरिषदेच्या कोविड केअर सेंटरला रुग्णांसाठी सामग्री दिली़
औषधांचा संच, पीपीई कीट, फेस शिल्ड मास्क, फेस मास्क, ॲप्रन व जंतुनाशक असे साहित्य रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, नगरसेवक सुहेल मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी भोईर यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आले.
यावेळी मातोश्री ट्रस्टतर्फे ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण, संदीप परब, अरविंद मालाडकर, बिपिन शिंदे, शैलेश मुकादम, नैनेश कामेरकर, अमोल श्रीनाथ व बांधकाम व्यावसायिक जयंतीलाल जैन, रोहित पटेल व मिऱ्या ग्रामपंचायतीचे सदस्य अबू भाटकर, हेल्पिंग हँडचे रूपेश सावंत, महेंद्र नागवेकर उपस्थित होते.
-----------------------
माताेश्री सेवाधाम ट्रस्टतर्फे रत्नागिरी नगरपरिषदेच्या काेविड केअर सेंटरला औषधे व संरक्षक सामग्री भेट देण्यात आली़ यावेळी मनाेज चव्हाण, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, अरविंद मालाडकर, मुख्याधिकारी प्रशांत ठाेंबरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते़ (छाया : तन्मय दाते)