राधाकृष्ण मंडळातर्फे विद्यार्थ्यांना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:31+5:302021-08-20T04:36:31+5:30
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावातील एकमेव पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास ...
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील निवधे गावातील एकमेव पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यास सुरू असला तरी आवश्यक असलेल्या साहित्यांची गरज भासत होती. या मुलांना निवधे येथील राधाकृष्ण मंडळातर्फे मदतीचा हात देऊन शालेय साहित्य देण्यात आले.
मुलांचा प्राथमिक पाया मजबूत व्हावा व त्यांची शिक्षणाची गैरसाेय हाेऊ नये यासाठी निवधेतील राधाकृष्ण मंडळ गवळीवाडीने पुढाकार घेतला. या मंडळाने गावातील अंगणवाडीपासून ते कॉलेजपर्यंत जाणाऱ्या सुमारे १३० विद्यार्थ्यांना देऊन मदतीचा हात दिला. शालेय बॅग, वह्या, कंपासपेटी, पेन, पेन्सिल अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तर मार्लेश्वर ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आली. यावेळी उपसरपंच अश्विनी चव्हाण सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील संतोष चव्हाण, मदतनीस, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, विद्यार्थी पालक यावेळी उपस्थित होते.