मोरवणेतील दोन अनाथ मुलींना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:22 AM2021-07-15T04:22:29+5:302021-07-15T04:22:29+5:30
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे येथील मुख्याध्यापक मयाराम पाटील व निवृत्त पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे यांना अनाथ मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी ...
चिपळूण : तालुक्यातील मोरवणे येथील मुख्याध्यापक मयाराम पाटील व निवृत्त पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे यांना अनाथ मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येकी पाच हजारांची देणगी दिली.
जिल्हा परिषद शाळा नंबर १ मधील दिशा एकनाथ आंबोळकर, अक्षता प्रवीण पालांडे या दोन विद्यार्थिंनींना शैक्षणिक कामकाजासाठी मदत देण्यात आली. या दोन्ही मुलींचे वडील हयात नाहीत. त्यामुळे सामाजिक भान ठेवून मुख्याध्यापक पाटील व निवृत्त पोलीस निरीक्षक शिंदे यांनी या मुलींनी मदतीचा हात दिला आहे. मुख्याध्यापक पाटील हे गेली १४ वर्षे मोरवणे येथील जिल्हा परिषद शाळा नं. १ येथे कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने सामाजिक कार्यात योगदान दिले आहे. गाव तंटामुक्त करणे असो वा स्वच्छता अभियान, या सर्व उपक्रमात त्यांचा सहभाग राहिला आहे.