मुंबईच्या श्वान-मांजरांना हवंय दही -दूध-लोणी; क्वारंटाईन केलेल्या लोकांची मिजास भारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 06:28 PM2020-05-11T18:28:13+5:302020-05-11T18:36:48+5:30
मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.
राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील क्वारंटाईन केलेल्या लोकांपेक्षा त्यांनी मुंबईतून सोबत आणलेल्या श्वान, मांजराची मिजास पुरविण्यास प्रशासन अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. क्वारंटाईन लोकांना सेवा-सुविधा पुरवताना भीक नको पण कुत्रं आवर अशी म्हणण्यायची वेळ आली आहे.
रायपाटण येथील शासनाने बांधलेल्या समाज कल्याण वसतिगृहात १००-१५० लोकांना राहण्यास सुयोग्य अत्याधुनिक सोयी-सुविधा अशा व विद्यार्थी वस्तीगृहाची उभारणी केली गेली आहे. गाव-वस्तीपासून दूर असलेल्या पाचल-हरळ सीमेवरील रायपाटणच्या हद्दीत असलेल्या समाज कल्याण वसतिगृहात सुमारे १२५ क्वारंटाईन नागरिक ठेवण्याची व्यवस्था आहे. समाज कल्याण वसतिगृह शासनाने अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे अद्यापही अपुऱ्या सोई-सुविधा तसेच कोणताही समाज कल्याण वस्तीगृहाचा कर्मचारी कार्यरत नाहीत, प्रशासनाने तूर्तास ही इमारत आहे. त्या स्थितीत ताब्यात घेऊन क्वारंटाईन नागरिकांना आणून ठेवले आहेत.
त्याचबरोबर मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.
श्वान-मांजरी आणलेले हे लोक श्वान आणि मांजरांसाठी दही-भाताची ही मागणी करत आहेत. त्यामुळे या पाळीव प्राण्यांची ही मिजास पुरवताना प्रशासन बेजार झाले आहेत.