किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 06:19 PM2019-02-22T18:19:18+5:302019-02-22T18:20:01+5:30

दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

 High alert on the coastline - thorough checking of boats | किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

किनारपट्टीवर हाय अलर्ट - बोटींची कसून तपासणी

Next
ठळक मुद्देपोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

रत्नागिरी : दहशतवादी संघटनांकडून भारतात प्रवेश करुन हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात ह्यहाय अलर्ट जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवर सुरक्षेच्यादृष्टीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कस्टम विभागामार्फत बोटींची कसून चौकशी करण्यात येत आहे. बोटीवरील खलाशी पाकिस्तानी आहेत, नेपाळी आहेत की भारतीय याची करण्यात येत आहे.

येत्या तीन महिन्यात मुंबईतील रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता भारतीय गुप्तचर विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यातच रायगडच्या आपटा गावात एस्. टी. बसमध्ये बॉम्ब सापडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

पोलिसांनी सर्व मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर सागरी भागात समुद्रात संशयित जहाज, बोटी किंवा व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले आहे. मुंबईवर २६/११ ला झालेल्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्रमार्गे आले होते. या हल्ल्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्व सागरी किनाऱ्यांवर सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तसेच १९९३मध्ये रायगड किनाऱ्यावर काही स्फोटके आढळून आली होती. त्याअनुषंगाने पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.

Web Title:  High alert on the coastline - thorough checking of boats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.