रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:44 PM2020-12-03T17:44:33+5:302020-12-03T17:46:00+5:30

Coronavirus Unlock, ratnagirinews कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

The highest number of corona victims in Ratnagiri district is in the age group of 60 to 70 years | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातील

Next
ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक बळी ६० ते ७० वयोगटातीलदुसऱ्या लाटेत खबरदारी घेण्याची अधिक गरज

शोभना कांबळे

रत्नागिरी : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ६० ते ७० या वयोगटातील व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ६० ते ७० या वयोगटातील ज्येष्ठांची अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले होते. त्यानुसार ज्येष्ठ घरातच थांबले होते. मात्र, मे महिन्यात गावी आलेल्या मुंबईकरांमुळे जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढले. त्यानंतर स्थानिक बाधित होण्याचे प्रमाणही वाढले.

त्यातच गणपती उत्सवात लॉकडाऊन शिथील झाल्याने पुन्हा लोकांना कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचा विसर पडला. त्यामुळे घरातील ६० ते ७० वयोगटातील व्यक्ती, गंभीर आजारांचे रूग्ण यांना संसर्ग झाल्याने ते कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरले.

१२८ जणांचा सप्टेंबरमध्ये मृत्यू

ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबई, पुणे आदी भागातून चाकरमानी आले. या उत्सवादरम्यान लॉकडाऊन अधिक शिथील करण्यात आल्याने लोकांकडून मास्क तसेच शारीरिक अंतराचे पालन केले गेले नाही. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. लोक आजार लपवू लागल्याने याकाळात मृत्यूचे प्रमाण लक्षणीय वाढले.

बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे वाढ

सुरूवातीला बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोनाचे रूग्ण वाढले. मे महिन्यापर्यंत रूग्णसंख्या आटोक्यात होती. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करणे आरोग्य यंत्रणेला शक्य झाले.

लक्षणे लपवून ठेवल्याने उपचाराला विलंब

मे महिन्यानंतर मात्र गावी आलेल्या मुंबईकरांमुळे स्थानिक लोक बाधित होऊ लागले. मात्र, लक्षणे लपवली जावू लागल्याने त्यांचे उशिरा निदान व उपचार होऊ लागले. त्यामुळे ग्रामीण भागात मृत्यूंचे प्रमाण वाढले.

Web Title: The highest number of corona victims in Ratnagiri district is in the age group of 60 to 70 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.