महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 04:26 PM2019-03-15T16:26:15+5:302019-03-15T16:27:51+5:30

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Highway four-lane: The two-step work in Ratnagiri is far behind | महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

महामार्ग चौपदरीकरण : रत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

Next
ठळक मुद्देमहामार्ग चौपदरीकरण, काम ६० टक्केच?, सिंधुदूर्ग आघाडीवररत्नागिरीतील दोन टप्प्यांचे काम खूपच पिछाडीवर

प्रकाश वराडकर 

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम आतापर्यंत ५० ते ६० टक्के एवढेच झाले आहे. खेड, चिपळूण विभाग तसेच राजापूर ते सावंतवाडीपर्यंतच्या विभागामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते तळेकांटे व तळेकांटे ते वाकेड (लांजा) या दोन टप्प्यांमधील काम मात्र सर्वात पिछाडीवर आहे. या दोन टप्प्यांमध्ये केवळ ८ ते १० टक्केच काम झाले असून, हे काम लवकर पूर्ण न झाल्यास चौपदरीकरणाच्या उद्घाटनाचा २०२० मधील मुहुर्तही पुढे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाची लांबी कशेडी ते खारेपाटणपर्यंत १७२ किलोमीटर आहे तर खारेपाटणपासून झारापपर्यंत महामार्गाची लांबी ही १२० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून २९२ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे काम रत्नागिरीचा अपवादवगळता वेगात सुरू आहे.

दोन्ही जिल्ह्यात सुमारे ५० ते ६० टक्के काम पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तळेकांटे ते लांजा तालुक्यातील वाकेडपर्यंतचे सुमारे ७० किलोमीटरचे चौपदरीकरण रखडले असून, ते ८ ते १० टक्केच झाले आहे. त्यामुळे महामार्गाचे कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण पूर्ण होणार कधी व त्याचे उद्घाटन होणार कधी, असा सवाल केला जात आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या दोन दशकांपासून रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाला खऱ्या अर्थाने चालना दिली. २०१३ मध्ये कॉँगे्रस सरकारने या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली होती. त्यानंतर केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीएचे सरकार आले.

केंद्रात परिवहन, रस्ते विभागाचे मंत्रीपद नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात आले. गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या केवळ चौपदरीकरणालाच नव्हे तर कॉँक्रीटीकरणातून चौपदरीकरण प्रकल्पाला चालना दिली. त्यानंतर ३६६ किलोमीटर चौपदरीकरणाचे कामही सुरू करण्यात आले.

हे काम लवकर होण्यासाठी गडकरी यांनी तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची एकत्रित बैठकही घेतली. कामांचे टप्पे निश्चित झाले. काम प्रत्यक्षात २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. मात्र, अनंत अडचणींचा सामना करीत हे काम सुरु आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण ते झारापपर्यंत चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामाचा विचार करता सिंधुदुर्गमध्ये चौपदरीकरणाचे काम ६० ते ७० टक्केपर्र्यंत झाले आहे. सिंधुदुर्गमधील चौपदरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरून वाहतूकही केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात हेच प्रमाण ३० टक्केपर्यंत आहे. आरवली ते वाकेड या दोन टप्प्यांमधील रखडलेले चौपदरीकरण हे टक्केवारी कमी होण्याचे कारण ठरले आहे.

अनेक ठिकाणी उड्डाणपूल

चिपळूण शहर, पाली, लांजा या ठिकाणी चौपदरीकरण प्रकल्पामध्ये उड्डाण पुलांचा समावेश आहे. राजापूरमध्ये प्रार्थनास्थळाचा विषय महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे प्रार्थनास्थळापासून दूरच्या अंतरावरून चौपदरीकरण केले जात आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी ४५ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी जागा घेण्यात आली आहे. चिपळूणमध्ये कापसाळपर्यंत उड्डाणपूल होणार आहे. मात्र, त्याची लांबी आणखी वाढविण्याची मागणी होत आहे.

Web Title: Highway four-lane: The two-step work in Ratnagiri is far behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.